उस्मानाबाद जिल्ह्यात सातवाहनापासून ते राष्ट्रकुट, कलचुरी चालुक्य, यादव, मराठा अशा वेगवेगळ्या राजवटी नांदलेल्या दिसतात.
यातील चालुक्य काळात जिल्हा व परिसरात बऱ्याच प्रमाणावर मंदिरे व मूर्ती निर्माण केलेल्या आढळून येतात. यातही विविध पंथ मानणारे राजे होऊन गेले. त्यापैकी बहुतांशांनी मंदिरात गणरायाला मानाचे स्थान दिलेले दिसते.
उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या माणकेश्वर, उमरगा येथील महादेव मंदिराप्रमाणेच मुरूम या गावीही भूमीज पद्धतीचे भव्य असे मंदिर होते. या मंदिरात असणारा हा लंबोदर गणराय होय. मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास तो चालुक्य काळात घडविलेला असल्याचे स्पष्ट होते. गणेश प्रतिमेच्या उजव्या वरील हातात परशू खालील हातात दंत, डाव्या वरील हातात कमळ फूल, खालील हातात मोदक पात्र आहे. डोक्यावर करंडक मुकुट असून, हातात केऊर, कंकण, अंगठ्या घातलेल्या आहेत व पायात तोडे आहेत. पोटावर सर्पयज्ञपोवित असून, गळ्यात माळ आहे . हा गणराय सालंकृत असून, रेखीव शिल्पीत केलेला आहे. मुरूम या गावी सुस्थितीत असलेल्या या गणरायाला ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने पूजतात.
संकलन : जयराज खोचरे, उस्मानाबाद
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद