बार्शी – महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाचे मा. प्राचार्या डॉ. भारती रेवडकर यांना आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुर्नजिवीत करावेत, सातवा वेतन आयोग, 58 महिन्याचा फरक दहा वीस तीस लाभांची आश्वासित प्रगती योजना व इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
राज्य भरात 13 व 14 डिसेंबर 2021 रोजी सहसंचालक उच्च शिक्षण यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण केले जाणार होते परंतु पोलिस परवानगी नसल्याने त्याला काळ्या फिती लावून निवेदन देण्याचे आंदोलन विद्यापीठ व महाविद्यालयीन ( University & college ) शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

शासनाने मागण्या मंजूर न केल्यास राज्यभरातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी 18 डिसेंबर 2021 शनिवारपासून बेमुदत संपावरती जातील. शिक्षकेतरांना संप करण्यास शासन जबाबदार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी महसंघाचे प्रतिनिधी भीमा मस्के , आयटकचे गणेश करंजकर, शिवाजी हाके , विजय दास, तेजस पाटील , घावटे हनुमंत, स्वामी सर, मूळवने मॅडम, कासार मॅडम ,चन्द्राकांत् गव्हाने, विकास घाटे आदी उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्धी विभागाचे – भीमा मस्के यांनी दिली.
जिथे बार्शी, तिथे सरशी!
Awake Craniotomy : पेशंट ला जागे ठेऊन डॉ जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मेंदूची शस्रक्रिया यशस्वी!
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले