बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित माननीय मिलींद शंभरकर, जिल्हाधिकारी सोलापूर, मा. तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या प्रयत्नातून व जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज बार्शी शहर पोलीस स्टेशन बार्शी नगरपरिषद नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे सर्व सभापती गटनेते संबंधित वार्डातील नगर सेवक नगरसेविका अधिकारी, पदाधिकारी कर्मचारी सर्व नागरिक उपस्थित होते मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील अधिकारी, कर्मचारी, सर्व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नागरीक यांचे नंबर उपलब्ध करून कॉल देवून 18002703600 प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री. डी. के. गोर्डे यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक 1 प्रामुख्याने नगरपरिषद मिटींग हॉल 2 सुभाषनगर रोटरी क्लब हॉल 3 उपळाई रोड शेंडगे प्लॉट येथे प्रात्यक्षिक दाखवले आहे. तसेच इतर भागामध्येही प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
ही यंत्रणा सुभाष नगर या भागात चालु केलेली आहे. गेल्या 9 वर्षांत पुणे, नाशिक, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील 3500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 हा आहे. नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित त्यांचे मोबाईल वर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट
- घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
- गावातील कार्यक्रम व घटना विना विलंब ग्रामस्थांना एकाच वेळी कळणे.
- अफवांना आळा घालणे.
- प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
- पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे. ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये
- गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
- संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 1800 2703600
- यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो
- संदेश देणार – या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
- दुर्घटनेचे स्वरूप , तीव्रता ठिकाण कळल्याने शहरवाशियांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
- नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात
- नियमाबाह्य दिलेले संदेश अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
- एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य होते.
- वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो .
- घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तो पर्यंत रिंग वाजते .
- संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
- चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप ठसंबा स्पेज होतात.
- गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन आदींना आपआपल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना आदेश देता येणे शक्य असल्याचे ग्राम सुरक्षा यंत्रणेकडील सत्यशिल घाटगे याने सांगितले. सदर कार्यक्रमाचे माहिती माहितीपत्रक व मार्गदर्शन ग्राम सुरक्षा यंत्रणा चे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश भोसले यांनी केले मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा ग्रामीण पोलीस दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, डॉ.विशाल हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभाग बार्शी, जिल्हा परिषद CEO दिलीप स्वामी यांचे लाभले, सदर कार्यक्रमाचे वेळी श्री . रामदास शेळके, पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे, प्रविण शिरसाट पोलीस उपनिरीक्षक, सुधिर गुळमे सहायक पोलीस उपनिरीक्षक, उत्तरेश्वर घुले बार्शी पोलीस ठाणे, विक्रमसिह घाटगे , गणेश भोसले, सत्यशिल घाटगे ग्रामसुरक्षा यंत्रणा जिल्हा समन्वयक, नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले सर्व सभापती गटनेते विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी त्या त्या भागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते पोलीस स्टेशनचे पोलीस, अध्यक्ष, सर्व सदस्य, मेडिकल असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, वैदयकिय अधिकारी, नागरीक, पत्रकार उपस्थित होते. बार्शी नगर परिषद हद्दीतील नागरीकांचे मोबाईल नंबर वैदयकिय अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांचे विशेष सहकार्य लाभले.
संबंधित बातमी – पोलिस आयुक्तालयाची नवी वेबसाईट पोलिसांत तक्रार नोंदविण्यासोबत इतरही सुविधा
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर