आज जगात सर्वच ठिकाणी डिजिटल प्रणालीचा वापर केला जातोय अणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती मिळवणे सोपे झाले आहे. देशात प्रत्येक नागरिकाला Adhar card च्या माध्यमातून एक आधार क्रमांक देण्यात आला आहे तसाच आता प्रत्येक घराला एक यूनिक कोड म्हणजेच Unic Digital Address Code देण्यात येणार आहे.
वाढती घरांची संख्या विचारात घेता बर्याच वेळी पत्ता किंवा चुकीच्या पिन कोड मुळे पत्र, कागदपत्रे, किंवा ऑनलाईन मागवलेल्या वस्तु मिळत नाहीत किंवा उशिरा मिळतात ही योजना सुरू झाल्यानंतर एखाद्या घराचा पत्ता देण्याऐवजी नवा कोड नंबर द्यावा लागणार आहे. हा कोड नंबरच आपल्या घराचा पत्ता असणार आहे तसेच बर्याच गोष्टींसाठी म्हणजे बँक कामे, मतदान नावनोंदणी, लायन्स, इत्यादी साठी अॅड्रेस प्रूफ द्यावा लागतो त्यावेळी सुद्धा घराच्या पत्त्याच्या पुराव्याची गरज भासणार नाही हे ही महत्वाचे आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार आता प्रत्येक घराला मिळणार एक यूनिक कोड
या योजनेमुळे आता एखाद्या गोष्टीसाठी घराचा पत्ता देण्याऐवजी हा कोड नंबर द्यावा लागणार आहे – म्हणजेच हा कोड नंबर घराचा पत्ता असणार आहे
त्यामुळे आता एखाद्या गोष्टीसाठी घराच्या पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार नाही, तसेच हा युनिक कोड सर्व ऑनलाईन सुविधांसाठी फायदेशीर ठरणार आहे
योजनेचे फायदे
▪︎ प्रत्येक घराचा पत्ता ऑनलाईन पडताळता येणार आहे
▪︎बँकेत खाते उघडण्यापासून ते टेलिफोन-वीज कनेक्शन घेण्यापर्यंत पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार नाही
▪︎ एखाद्या इमारतीत 50 फ्लॅट असल्यास, प्रत्येक फ्लॅटला एक विशिष्ट कोड
▪︎ दोन कुटुंबे एकाच मजल्यावर राहत असतील तर त्यांना देखील एक विशिष्ट कोड
▪︎ केवायसीसाठी बँक, विमा कंपनी कार्यालय किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही
▪︎ तसेच कॉर्पोरेट ऑफिस आणि सरकारी ऑफिस कॉम्प्लेक्सलाही वेगवेगळा डिजिटल कोड असणार आहे
आता प्रत्येक घराला यूनिक कोड मिळणार हि माहिती सर्व नागरिकांनासाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण इतराना देखील अवश्य शेअर करा
एकच मुलगी असेल तर मिळतात ५० हजार रुपये, कोठे व कसा कराल अर्ज
More Stories
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम साहेब यांचे जिल्हा स्तरीय किशोरी मेळाव्यात विविध विषयांवर हितगुज