Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > बार्शीतील त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने गणरायाला चांदीचा हार अर्पण

बार्शीतील त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने गणरायाला चांदीचा हार अर्पण

बार्शीतील त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने गणरायाला चांदीचा हार अर्पण
मित्राला शेअर करा

बार्शी :- गेले दहा वषार्पासून गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती असो उपळाई रोड येथे विविध सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा या विषयी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात त्रिमूर्ती प्रतिष्ठान हे नेहमी अग्रेसर असते. शिवजयंतीनिमित्त शिवरायांचा पाळणा असो जिजाऊंच्या जयंती निमित्त क्रिकेट स्पर्धा, रक्तदान शिबिर तसेच महाप्रसाद याचं आयोजन त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

मात्र यावर्षी यावर्षी या प्रतिष्ठानतर्फे एक वेगळाच निर्णय घेत मिरवणुकीचा खर्च टाळून मंडळांने गणेश मूर्तीसाठी चांदीचा हार व मुकुट केला. विविध मान्यवरांच्या हस्ते तो मुकुट आणि गणरायांना अर्पण करण्यात आला.

यावेळी बार्शी पोलीस स्टेशनचे ए.पी. आय उदार साहेब, पीएसआय कनेर्वाड साहेब वृक्ष संवर्धन समितीचे उमेश काळे, अतुल पाडे, लहू चव्हाण, प्रशांत जगदाळे, विजय राऊत, मांजरे महाराज, अजय वायकुळे हे उपस्थित होते. यावेळी गणरायाला अभिषेक घालून आरती करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष बबलू साळुंखे, उपाध्यक्ष प्रवीण शिंदे आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.