युएई येथून बावी (उस्मानाबाद) येथे आलेल्या रुग्णचा ओमीक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. शारजा, युएई ( संयुक्त अरब अमिरात ) येथून उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद तेर मार्गावरील बावी या गावात आलेल्या 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटि आल्यानंतर आता त्या रुग्णाचा ओमीक्रॉन अहवाल संशयित आहे.
उस्मानाबाद आरोग्य विभागाने 5 नमुने ओमीक्रॉन चाचणीसाठी पाठविले होते त्यापैकी 2 अहवाल ओमीक्रॉन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत यात बावी येथील तरुण व त्याच्या घरातील एकजण पॉझिटिव्ह आला आहे . बावी येथील या तरुणाच्या संपर्कातील आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत मात्र त्यांचा ओमीक्रॉन अहवाल येणे अद्याप बाकी आहे . उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील परदेश दौरा करून आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला त्याच्या संपर्काती जण पॉझिटिव्ह आले आहेत . कोरोनाचे निदान झाल्यावर व त्यापूर्वी म्हणजे परदेश दौरा केल्यावर गावात आल्यावर हा खुलेआम विनामास्क गावभर गाठीभेटी घेत फिरला. या व्यक्तीमुळे संपूर्ण गावाचा जीव टांगणीवर आला आहे त्यातच त्याचा ओमीक्रॉन अहवाल संशयित असल्याने चिंतेत भर पडलेली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी या गावात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्याने या गावाच्या सीमा बंद करून कलम 144 लागू करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर डॉ योगेश खरमाटे यांनी काढले आहेत . उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी या गावात कोरोनाचे 2 रुग्ण सापडल्याने या गावाच्या सीमा बंद करून कलम 144 लागू करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर डॉ योगेश खरमाटे यांनी काढले आहेत. बावी गावाच्यापासून तीन किलोमी पर्यंतच्या परिसरातील नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत . 3 किलोमीटरचा पर्यंतचा परिसर रेड झोन तर 7 किलोमीटर पर्यंतचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण आला आहे .
बावी या गावात हे आदेश आजपासून लागू होणार आहेत, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार हे निर्बंध लागू करण्यात आले असून या गावात नागरिकांना फिरण्या मज्जाव घालण्यात आला आहे तसेच बावी या गावातील सर्व मार्ग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . या आदेशाची अंमलबजावणी ग्रामीण पोलिसांनी करायचे असून या गावा ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवा पुरवण्याची मुभा राहील . अत्यावश्यक सेवा पुरविताना सोशल डिस्टन्सचे पालन कर बंधनकारक असणार आहे असे आदेश उपविभागीय दंडाधि डॉ खरमाटे यांनी काढले आहेत.
शासनाच्या गाईड लाईन्सनुसार मास्क वापरणे बंधनकारक आहे परंतु अलीकडच्या काळात लोकांनी मास्क वापरणे पूर्णपणे बंद केल्याचे चित्र दिसून येते. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!