Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > करमवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त संत तुकाराम विद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात

करमवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त संत तुकाराम विद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात

करमवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त संत तुकाराम विद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात
मित्राला शेअर करा

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दोन दिवस प्राथमिक विभागाच्या निबंध, वकृत्व, हस्ताक्षर, चित्रकला, रांगोळी, कथानक, समूहगीत व समूह नृत्य या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत संस्थेतील १५ शाळा सहभागी झाल्या होत्या.

स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून गणेश खंदारे, महादेवी स्वामी, सूरज कांबळे, प्रसाद पाटील, भूमकर, बचुटे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन अमोल महाले यांनी केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रमोद पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पिंटू नाईकवाडी व सर्व सहकारी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

निबंधमध्ये प्रथम स्वरा जगदाळे (महाराष्ट्र विद्यालय बार्शी), द्वितीय- मनस्वी भोसले (महाराष्ट्र विद्यालय बार्शी, तृतीय सुदिक्षा पाटील जिजामाता विद्यामंदिर बार्शी), वकृत्व प्रथम श्रेयस पांगरे (महाराष्ट्र विद्यालय बार्शी), द्वितीय राधिका गायकवाड (लोकसेवा विद्यालय आगळगाव), तृतीय – रंजना माने (जिजामाता विद्यालय बार्शी) यांनी पटकावला. हस्ताक्षर स्पर्धाः प्रथम शौर्य मिरगणे (महात्मा फुले विद्यामंदिर बार्शी), द्वितीय सानवी गोरे (महाराष्ट्र विद्यालय बार्शी), तृतीय हर्ष खराडे (महात्मा फुले विद्यामंदिर बार्शी ) पटकाविला. चित्रकला स्पर्धाः प्रथम जान्हवी मोरे (जिजामाता विद्यामंदिर बार्शी), द्वितीय तृप्ती विठू बाने (महाराष्ट्र संत विद्यालय तेर), तृतीय तनुजा डेंगळे (शिवाजी विद्यालय वाशी) तर रांगोळी स्पर्धाः प्रथम साक्षी करंजकर (जयहिंद विद्यालय कसबे, तडवळे), द्वितीय स्नेहल पवार (महाराष्ट्र विद्यालय बार्शी), तृतीय श्रेया करडे (छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी) पटकाविला. कथानक स्पर्धाः प्रथम श्रवण आरसूळ (महात्मा फुले विद्यालय बार्शी), द्वितीय आरोही राऊत (जिजामाता विद्यालय बार्शी), तृतीय आदित्यी मुळवणे (छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी) पटकाविला. समुह गीत स्पर्धा प्रथम किसान कामगार विद्यालय उपळाई ठोंगे, द्वितीय – जिजामाता विद्यामंदिर बार्शी, तृतीय जनता विद्यालय येडशी तर समुह नृत्य स्पर्धेत प्रथम जिजामाता विद्यामंदिर बार्शी, द्वितीय महात्मा फुले विद्यामंदिर बार्शी, तृतीय छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी व जय हिंद विद्यालय कसबे तडवळे यांना विभागून देण्यात आले.