बार्शी शहरामधील सामाजिक कार्यात अवड असलेल्या समाजातील युवकांना व महिला भगिणीना एकञीत करत, ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेची स्थापन तीन मार्च रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष , राहुल भैय्या वाणी यांनी केली संस्थेचे एकूण २१ संचालक असून सन्मानित सभासद यांची संख्या ५० असून दोन वर्षांपूर्वी एक रोपटे लावले होते, पाहता पाहता ते रोपटे आज २ वर्षाचे झाले आहे.
त्यानिमित्ताने आज सर्व सदस्यांनी एकञ येवुन संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला. यावेळी बार्शी शहरातील गरज ओळखून सुभाषनगर भागातील अंगणवाडी शाळेला टेबल आणी खुर्ची संस्थेच्या वतीने देण्यात आली तसेच या वर्धापनदिनी पुढील काळात घेणाऱ्या उपक्रमा बाबत विविध विषयावर चर्चा करण्यात आली व ती एक मुखाने मंजूर केली संस्थेचा इतिवृत्तांत वाचन संस्थेचे सचिव श्री विजयकुमार दिवाणजी यांनी केले.
यावेळी ओन्ली समाज सेवेचे सदस्य श्री गणेश कदम सर यांना संगमनेर येथे शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री चंद्रकांत उल भगत यांच्या सौभाग्यवती शितल उल भगत यांनाही शिवछत्रपती पुरस्कार मिळाला त्याबद्दल संस्थेच्या वतीने दोघांचाही सत्कार कुंडीतील झाडे देऊन करण्यात आला. तसेच या वर्धापनादिवशी राठी येथील कॅन्सर ग्रस्त पेशंटना अल्पोहार देण्यात आला. या वर्धापन दिवशी सर्व, पदाधिकारी सन्माननीय सदस्य तसेच महिला सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगीतले.
पुढील होणाऱ्या उपक्रमास सर्वांनी एकत्रित पणे काम करून संस्था वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे विनंती ही त्यांनी यावेळी केली
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी