बार्शी :- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यातील २०३ राम भक्तांना आयोध्येसाठी विशेष आस्था रेल्वेने पाठीवण्यात आले, याप्रसंगी बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सर्व राम भक्तांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
सुमारे पाचशे साठ वर्षाच्या लढ्यानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी आता दर्शनासाठी खुले झाले आहे प्रभू रामचंद्र हे सर्वसामान्यच्या अस्तित्वाच आणि त्याच सोबत अस्मितेच प्रतीक असलेलं स्थळ म्हणजे आयोध्या आणि या आयोध्यामध्ये भव्य दिव्य राम मंदिर श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उपस्थितीत ज्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झाला होता, त्या राम लल्लांचे दर्शन घेण्याचा योग बार्शी तालुक्यातील राम भक्तांना आला आहे हा अत्यंत आनंदाचा क्षण बार्शी तालुक्यासाठी आहे.
यावेळी बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, गटनेते विजय (नाना) राऊत, माजी नगरसेवक विलास (आप्पा) रेणके, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. रणवीर राजेंद्र राऊत, उद्योजक सुधीर बारबोले, माजी नगरसेवक नवनाथ चांदणे, संदेश काकडे, भाजपा शहराध्यक्ष महावीर कदम तसेच राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न