बार्शी, दि.4/3/24
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या वतीने देशभरातील युवक – युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण आदी विषयक विविध उपक्रम राबविले जातात.
त्याचाच एक भाग म्हणून युवकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी नेहरू युवा केंद्र सोलापूरच्या वतीने, क्रांती बहुउद्देशीय संस्था, बेलगाव व श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम व नारीशक्ती या विषयावर पंढरपूरचे नंदकुमार दुपडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन श्री संत तुकाराम सभागृह, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी या ठिकाणी दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील तमाम युवक – युवतींनी सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्र सोलापूरचे जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार यांनी केले आहे.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न