दि.२३. ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था गेली पाच वर्ष वेगवेगळे उपक्रम राबवत असते या दिवाळी निमीत्त गुरूदेव दत्त बहूउददेशीय वारकरी संस्था या संस्थेत ४५ अनाथ मुले आहेत या संस्थेच्या त्यांच्या मागणी नुसार 300 कीलो गहु देण्याचे ठरवले आणि संस्थेचे अध्यक्ष राहूल वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या महीला सदस्य आणि जेन्टस सदस्य कामाला लागले आणि लोकांना आवाहन करत लोक सहभागातुन त्यांनी या अनाथ मुलांसाठी 300ते 350 किलो गहू दिला.
या दिवाळी उपक्रमासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेस बार्शीतील देणगीदार, समाजसेवा आवड असलेले यांनी मोलाचे सहकार्य कले. हा गहु संस्थेच्या वतीने आज या संस्थेत जावून तेथील मुलांपर्यत व्यवस्थापकापर्यत पोहच केला. सोबत मुलांना दिवाळी गोड मिठाई, चिवडा वाटप केला.
या कार्यक्रमासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थीत होते. ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संतोष शेळगावकर, विजयजी दिवाणजी, नागनाथ सोनवणे, मानकोजी ताकभाते, अजय तिवारी, गणेश कदम सर, दिपक बगाडे, वैभव उकीरडे, बिभीषण अवताडे, सूनिल नवले, प्रतिक खंडागळे, दिपक ढोणे, अतुल वाणी, प्रविण काळेगोरे, सुमितभैय्या खुरंगळे, सागर घंटे, गणेश गळीतकर, चैतन्य दिवानजी, प्रसाद पवार, राहुल नागटिळक, गणेश सातारकर, ओकांर विधाते, बालाजी घावटे, बाळु लोखंडे, फल्ले सर यांचे परीश्रम लाभले तसेच या कार्यक्रमासाठी महीला सदस्य देखील पूढे होत्या यामध्ये सायरा मुल्ला, माधुरी वाणी, रेखा सुरवसे ( विधाते) कोमल वाणी जाधवर, रागीनी झेंडे, सुजाता अंधारे अपर्णा शिराळ, संगिता ताई पवार, कोमल काळेगोरे, कोमल कोठावळे, पुजा नवले, रेखा वराडे, लक्ष्मी मोहिते, नंदा कुलकर्णी, रेखा सरवदे, सुजाता अंधारे, सुनिता गायकवाड, सारीका पुकाळे, ञिशाला मिसाळ, पार्वती जाधवर संतोषी शेवते मंदा बोकेफोडे, आगलावे ताई महीला सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगीतले.
यावेळी गुरुदेव शिक्षण संस्था बार्शी चे अध्यक्ष सागर महाराज कोल्हळे उपस्थित होते
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक