बार्शी – प्रचंड महागाई वाढत असतानासुद्धा राज्यातील साखर कारखान्याकडून मागील दहा वर्षांपूर्वी ऊसाला जो दर मिळत होता त्याच्यापेक्षा खूप कमी दर मिळू लागल्यामुळे विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली.
या शिष्टमंडळाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी सुमारे एक तास चर्चा करून राज्यातील विविध साखर कारखान्यांच्या तक्रारी व गाऱ्हाणी मांडली. यावेळी आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. त्यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सतीश मोरे, उस्मानाबादचे आनंद करळे, इंदापूर तालुका अध्यक्ष गुलाब फलफले, साताऱ्याचे संतोष खुरंगे, सोलापूरचे सचिन आगलावे, सौदागर डांगरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
एकरकमी एफ आर पी द्या, राज्यातील सर्वच साखर कारखान्यांची त्यांच्या स्थापनेपासून न्यायालयीन चौकशी करा, चालू हंगामात पहिली उचल २७०० तर अंतिम दर प्रति टन ४००० द्या. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले असून लवकरच मागण्यांची पूर्तता न झाल्यास विविध कारखाने व साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलने करणार असल्याचा इशाराही यावेळी गायकवाड यांनी दिला.
More Stories
संवर्धन समिती बार्शी, गौरी गणपती पर्यावरण संवर्धन सजावट स्पर्धा 2024
प्रिसिजन वाचन अभियानगुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी!
महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थ्यांनी मानसी सुहास काळे हिची जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे निवड