दिनांक-१७-१०-२०२४ रोजी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाच्या शिक्षणशास्त्र विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मातीकाम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विजयसिंह पाटील यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून मातीकाम कलाकार श्री. अविराज चांदणे उपस्थित होते.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. चांदणे यांनी सांगितले की, किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता विकसित करण्यासाठी मातीकाम हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून राजहंस पक्षी कसा बनवायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
याचबरोबर, मोबाईलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे
दूर ठेवता येते असे सांगितले. कार्यशाळेत प्रा. विजयसिंह पाटील यांनी मातीकामासाठी लागणाऱ्या रोलिंग, शेपिंग, जॉइनिंग, टेक्स्चरिंग यासारख्या तंत्रांची सखोल माहिती दिली. माती कामासाठी उपयोगी असलेल्या ऑनलाइन स्त्रोतांची आणि संबंधित पुस्तकांची माहितीही विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गादेकर आणि संस्थेच्या संचालिका सौ. वर्षा ठोंबरे यांनी कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुष्कर गांधी यांनी केले .
सूत्रसंचालन डॉ. कलप्पा व्हनहुवे यांनी , तर आभार प्रदर्शन प्रा. रोहित कांबळे यांनी केले. श्री. जितेंद्र गाडे, श्री. अमोल शेळगावकर आणि श्री. ऋषिकेश सुलाखे यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक