शालेय जीवनात विद्यार्थ्यांना खरेदी विक्री व्यवहाराची माहिती झाली तर भविष्यात उत्तम व्यावसायिक तयार होतील असे विचार मा संजय पाटील पर्यवेक्षक न. पा. शिक्षण मंडळ बार्शी यांनी व्यक्त केले ते शाह कन्या प्रशालेत आयोजित आनंद बाजार उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

150 विद्यार्थीनीनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, भाजीपाला, कपडे, दागिने यांची दुकाने लावली होती या बाजारात पालक तसेच विद्यार्थिनीनी विविध वस्तूंची भरपूर खरेदी केली.
या वेळी संस्थेचे पदाधिकारी नागनाथ देवकते, शशिकांत गोडगे वैष्णवी हातोळकर, मुख्याध्यापक भारत पवार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले मुख्याध्यापिका सौ प्रज्ञा वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संदेश घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
More Stories
श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रीय उद्योजकांच्या यादीत बार्शीतील कसपटे यांचा समावेश