Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > महाराष्ट्र विद्यालय बार्शी कडून सायकल रॅलीचे आयोजन

महाराष्ट्र विद्यालय बार्शी कडून सायकल रॅलीचे आयोजन

मित्राला शेअर करा

बार्शी: १५ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या आजादी का अमृत महोत्सव निमित्त आज दिनांक ७/८/२०२२ वार रविवार रोजी सकाळी ८ वाजता भव्य अशी सायकलची रॅली चे आयोजन महाराष्ट्र विद्यालय बार्शी यांनी केले होते.

या रॅलीचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे व विद्यालयाचे प्राचार्य जी. ए. चव्हाण यांनी झेंडा दाखवून केले. या रॅलीमध्ये ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या रॅली चे नियोजन खालील प्रमाणे करण्यात आले होते. रॅली सकाळी ठीक ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यापासून पासून सुरू करण्यात आली व शहरातील प्रमुख चौकातून फिरून परत डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या पुतळ्यापाशी येऊन समाप्त करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून व विद्यार्थ्यांच्या सोबत सहशिक्षक अशा पद्धतीने अतिशय शिस्तबद्ध असे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी भारत माता की जय व पर्यावरण विषयक घोषणा देऊन समाजप्रबोधनाचे कार्य केले.

ही रॅली यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य जी.ए.चव्हाण, उपमुख्याध्यापक आर.बी.सापताळे सह-शिक्षक अनिल पाटील, पुष्कराज पाटील, योगेश उपळकर, अतुल नलगे, सिद्धेश्वर शिंदे, अविनाश जाधव, सुजित लोखंडे ,पवन जगदाळे, आदित्य पाटील, शिवराज बारंगुळे, श्रीमती कोल्हे मॅडम, श्रीमती लोमटे मॅडम, श्रीमती मोहिते मॅडम, श्रीमती पी.एस. जाधव मॅडम, श्रीमती जुगदार मॅडम, श्रीमती शेळके मॅडम, श्रीमती पवार मॅडम, श्रीमती पांढरे मॅडम या सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.