देशाचे अर्थ राज्यमंत्री ना. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा आर्थिक मंथन परिषद पार पडली. या परिषदेस खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, लातूरचे जिल्हाधिकारी श्री. बी. पृथ्वीराज, लातूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिनव गोयल यांच्यासमवेत उपस्थित ही परिषद संपन्न झाली.
याप्रसंगी मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा नसल्यामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. प्रामुख्याने राज्यातील चार आकांक्षीत जिल्ह्यांच्या विकासासाठी बँकेच्या अतिरिक्त शाखा सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. युवकांना उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा असूनही भांडवलाच्या अभावी त्यांना ते शक्य होत नाही याच्या साठी बँकेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठा केल्यास राज्यातील चारही जिल्हे आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीतून नक्कीच बाहेर येतील अशी सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थिती याठिकाणी मांडताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुचवले की उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबादी शेळी भारतात प्रसिद्ध आहे व अलीकडील काळात मांसाची वाढती मागणी लक्षात घेता योग्य मार्गदर्शन व अर्थपुरवठा करून या व्यवसायास मोठे स्वरुप देता येईल ज्या द्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतील. तसेच खवा उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे या माध्यमातून सुद्धा रोजगार उपलब्ध होतील, उसासे उत्पादन ही वाढले आहे यासाठी गूळ पावडर उद्योगाला मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, ग्रामीण भागात महिला बचत गटांना भरीव मदतीची गरज आहे या संदर्भात त्यांनी सुचना केल्या.
त्यासोबतच ज्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज पाहिजे आहे पण तारण नसल्यामुळे ते कर्ज घेऊ शकत नाहीत ज्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणापासून ते वंचित राहतात त्या शैक्षणिक कर्जाच्या अटी शिथिल करण्याबाबत अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना विनंती केली. त्या सोबतच बँकेमध्ये येणाऱ्या ग्राहकाला सन्मानपूर्वक वागवणूक देऊन बँक व्यवस्थापकाला तीन लाख रुपये पर्यंत कर्ज वाटप करण्याबाबत चे अधिकार देण्याबाबत विनंती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. खेडेगावातील महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवणारी महिला बचत गटांना ही कर्ज पुरवठा करण्याबाबत बँकिंग क्षेत्रात पुढाकार घेण्याबाबत निर्देश देण्यात यावेत या बाबत ही केंद्रीय राज्यमंत्र्यांना निवेदन दिले.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.
हनुमान विद्यामंदिर, कव्हे ची यशाची परंपरा कायम