महाराष्ट्र शासनाच कलासंचालनालया मार्फत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यां करीता दरवर्षी सप्टेंबर महिन्यात शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन केले जाते परंतू गेल्या २ वर्षांपासून कोविड – १९ चे प्रार्दुभावामुळे शाळा बंद असल्याने सदर परीक्षा शासनाकडून आयोजित झाल्या नाहीत.
सदर दोन्ही परीक्षा उर्तीर्ण असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेच्या गुणपत्रीकेमध्ये कलेचे वाढीव कलागुणांचा लाभ मिळतो . मागील वर्षीही परीक्षा झाल्याने सवलतीचे गुणांपासून विद्यार्थ्यांना वंचीत राहावे लागले असते . परंतू ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी ग्रेड परीक्षा उर्तीर्ण केली आहे त्यांना सवलतीचे गुण देण्याची मुख्य मागणी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने शासनाकडे केली होती . त्यामुळे याबाबत गेल्या वर्षातील विद्यार्थी हितार्थ शासनाने सकारात्मक निर्णय घेवून या सवलतीच्या कलागुणांचा लाभ हा विद्यार्थ्यांना दिलेला होता .
राज्यात कोविडचा प्रार्दुभाव कमी झाल्यामुळे राज्यातील बंद असलेल्या शाळा १ डिसेंबर २०२१ पासून सुरू केल्या तर माध्यमिक शिक्षण मंडळाने शालांत परीक्षेचे ४ मार्च २०२२ पासुनचे वेळापत्रक जाहीर केले त्यामुळे शालांत परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे सवलतीचे गुणांचे प्रस्ताव शाळांनी माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सादर करणे आवश्यक हो ते त्यामुळे कलासंचालनालयाच्या वतीने शासकीय रेखाकला परीक्षा आयोजीत करण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याने याबाबत महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने या वर्षी सवलतीचे वाढीव गुणांपासून विद्यार्थी वंचीत राहू नये या करीता कलासंचालनालयाचे वतीने शालांत परीक्षा आयोजनापूर्वी एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेचे आयोजन करण्याची मागणी राज्याचे मा मुख्यमंत्री , उध्दवजी ठाकरे , मा उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार , मा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत , तसेच उच्च व तंत्र शिक्षण सचिव यांचे कडे सातत्याने गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावे करून मागणी केली होती.
१५ डिसेंबर २०२१ रोजी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विनोद इंगोले यांनी मा उदयजी सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची प्रत्यक्ष मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली होती . त्या अनुशंगाने मा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी तातडीने कलासंचालक यांना दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी लेखी स्वरुपात सं.रा. उतेकर कार्यासन अधिकारी , महाराष्ट्र शासन यांचे स्वाक्षरीने आदेश काढून या परीक्षांचे आयोजन व प्रमाणपत्राचे वाटप कला संचालनालयाकडून करण्यात यावे असे कळवीले होते . त्या अनुशंगाने आता वर्ग ९ वी १० वी चे विद्यार्थ्यांकरिता एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड या शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन फेब्रुवारी २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात ऑनलाईन पध्दतीने करण्यात येऊन सदर परीक्षेचे वेळापत्रक १८ जानेवारी २०२२ पर्यंत प्रसिध्द करण्याची माहिती कलासंचालनालयाचे वतीने कलासंचालक राजीव मिश्रा यांच्या स्वाक्षरीने ६ जानेवारी २०२२ रोजीचे परीपत्रकान्वये प्रसारित केली आहे.
त्यामुळे या वर्षी शालांत परीक्षेस प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून अखेर महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या सततच्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे रेखाकला परीक्षा आयोजनाबाबत शासनाचे सकारात्मक निर्णय घेतल्या बद्दल महासंघाचे राज्याध्यक्ष विनोद इंगोले प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंके , प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे किरण सरोदे , प्रदेश सहचिटणीस मिलिंद शेलार प्रदेश कोषाध्यक्ष राजेश निंभेकर प्रदेश सदस्य विवेक महाजन , रमेश तुंगार , नवाब शहा , जेष्ठसल्लागार हुसेन खान , सुनिल महाले , विभागीय कार्याध्यक्ष रामचंद्र इकारे , जिल्हा अध्यक्ष संजय पवार सचिव सावता घाडगे , कोषाध्यक्ष शिवभूषण ढोबळे व सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य यांनी आभार मानले.
Nice step to take online exam.. What are the subject for exam.. What will be the procedure of online drawing grade exam… How to teach the student according