पंचायत समिती माळशिरस येथे भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याचे औचित्य साधून हल क्लाउड मशीनचे लोकार्पण व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या नोंदणीचा शुभारंभ
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , आमदार राम सातपुते , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील , भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते पाटील , जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी , सहकार महर्षी व अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करुन संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी आमदार राम सातपुते यांनी व सहकार महर्षी कारखान्याचे व्हा . चेअरमन प्रकाश आप्पा पाटील यांनी मनोगतामध्ये पंचायत समितीच्या कार्याचे कौतुक केले.
मदनदादासाहेब यांनी त्याच्या मनोगतामध्ये आरोग्य विभागाने कोविड काळामध्ये व नोंदणी शिबीर आयोजित केल्याबद्दल आरोग्य विभागाचे आभार मानले . हल क्लाउड मशीन तालुक्यातील 12 प्राथमिक आरोग्य केंद्राना केंद्र शासनाच्या माद्यमातून उभारून देण्यात आली आहे . या मशीन वरती 26 प्रकारचे रिपोर्ट तात्काळ उपलब्ध होतात .
देशाचे प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतुन प्रधानमंत्री जन आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले . या योजनेच्या शिबीराचे उदघाटन करण्यात आले . या योजनेचा लाभ तालुक्यातील 1 लाख 50 हजार पात्र लाभार्थीना होणार आहे . या योजनेतुन 5 लाखाचा आरोग्य विमा उतरविन्यात येणार आहे . यामध्ये 104 आजारावरती मोफत उपचार दिला जाणार आहे . यामध्ये प्रामुख्याने कोविड चा समावेश ही करण्यात आला आहे .
या योजनेसाठी तालुक्यातील कदम हॉस्पिटल , देवडीकर हॉस्पिटल , ICU क्रिटिकेअर , सूर्यवंशी हॉस्पिटल या दवाखान्याची निवड करण्यात आली आहे . या योजनेमुळे आरोग्य विषयकची आर्थिक अडचण दूर होणार आहे . पंचायत समिती उपसभापती प्रतापराव पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये हे शिबीर 12 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठरविलेल्या वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे अशी माहिती दिली व अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी मा. विजयसिंह मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सूचनेवरून हे शिबीर राबविण्यात आले आहे असे सांगितले . नोंदणी केलेल्या लाभार्थीना औपचारिक रित्या कार्ड वाटप करण्यात आले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर