Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > पंढरपूरला 18 ऑक्टोबरला रोजगार मेळावा इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

पंढरपूरला 18 ऑक्टोबरला रोजगार मेळावा इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

पंढरपूरला 18 ऑक्टोबरला रोजगार मेळावा इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन
मित्राला शेअर करा

सोलापूर,दि.11 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व गुरुप्रसाद कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली आहे.

रोजगार मेळाव्यासाठी औद्योगिक परिसरातील नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून त्यांच्याकडून विविध प्रकारची रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, बीए, बी. कॉम, पदवीधर, आयटीआय, वेल्डर, फिटर, बी.एस्सी, एम.एस्सी, ट्रेनी, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, जीएनएम, बी. फार्म, एम. फार्म, एम.बी.ए. इत्यादी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्रताधारक नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच नवउद्योजकांसाठी शासनाचे विविध महामंडळे व त्यांची कर्ज योजनांची माहितीसत्र आयोजित केली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in

या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे. तसेच 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वा. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्कचौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.