Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > पोलिस आयुक्तालयाची नवी वेबसाईट पोलिसांत तक्रार नोंदविण्यासोबत इतरही सुविधा

पोलिस आयुक्तालयाची नवी वेबसाईट पोलिसांत तक्रार नोंदविण्यासोबत इतरही सुविधा

मित्राला शेअर करा

पोलिस आयुक्तालयाचे नवे संकेतस्थळ ज्याद्वारे घरबसल्या करू शकता पोलिसांत तक्रार तसेच इतर सुविधा या साइटवर उपलब्ध असणार आहेत सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाने नागरिकांच्या सोयीसाठी ड्रीम केअर डेव्हलपर्सच्या माध्यमातून


www.solapurcitypolice.gov.in


ही नवीन वेबसाईट विकसित केली आहे . सिटिजन पोर्टलची लिंक या वेबसाईटला जोडल्याने शहरातील नागरिकांना घरबसल्या त्यावरून शहर अथवा राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार देता येणार आहे . पोलिस आयुक्तालयाचे नवे संकेतस्थळ मराठी व इंग्रजी भाषेतून तयार करण्यात आले आहे . तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने नागरिकांना लॅपटॉप अथवा संगणकाच्या डेस्कटॉपवर काही सेंकदात ते संकेतस्थळ उघडता येईल , असा विश्वास पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी व्यक्त केला.

पोलिस आयुक्त ते सहाय्यक पोलिस आयुक्तांसह सर्व पोलिस ठाणी , पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे मोबाईल क्रमांक , पत्ता , चौकी , बीट मार्शलची देखील माहिती त्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे . ही वेबसाईट फेसबुक , ट्विटरशी जोडली आहे . आपले सरकार पोर्टलची लिंक त्या संकेतस्थळाला जोडल्याने नागरिकांना विविध प्रश्नांवर थेट सरकारकडेही तक्रार करता येणार आहे . स्वतंत्र ऍडमिन पॅनेल दिल्याने वेबसाईट दररोज अपडेट असेल , असे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी स्पष्ट केले .

या संकेतस्थळाचा डेमो सोमवारी ता . 22 रोजी पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहिला . यावेळी पोलिस उपायुक्त बांगर , गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे , सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे , उपनिरीक्षक बायस , विवेक मेंगजी आदी उपस्थित होते.

संकेतस्थळाची वैशिष्ट्ये

● वेबसाईट युझर फ्रेंडली असल्याने सर्वांसाठी वापरण्यास सोपी

● वाहतूक शाखेशी संबंधित दंड व नियमांची मिळणार माहिती

● महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी टिप्सही त्या संकेतस्थळावर
● पोलिस आयुक्तालयाचे अधिकार , पोलिस भरतीची माहिती , पोलिस विभागाच्या उपक्रमांची मिळणार माहिती या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.