औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणीअन्न व औषध प्रशासनाची कारवाई
“मायफेअर क्रिम” चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर ‘त्वचेचा रंग उजाळते‘ अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे भिवंडी येथील गोडाऊनमधून 14 लाखांचा व नागपूर येथून 34 लाखांचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व औषध नियंत्रण प्राधिकारी दा.रा. गहाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 106, अनुसूचीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याचे औषध निरीक्षक प्रशांत आस्वार व रासकर यांनी भिवंडी येथे तर नागपूर येथे औषध निरीक्षक महेश चौधरी यांनी साठा जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादकांनी औषधे व जादुटोणा आदी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 व नियम 1955 आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 च्या तरतुदीचे उल्लंघन करणा-या जाहिराती प्रसिध्द करु नयेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह जाहिराती आढळल्यास अन्न व औषध प्रशासनास हेल्पलाईन क्रमांक 1800222365 वर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
ऐकायला येऊनही न ऐकणारे खरे कर्णबधीर : लेखक, सचिन वायकुळे
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांच्या कृषि संशोधन केंद्रांना भेटी