एलआयसीच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त बार्शी मध्ये ४ सप्टेंबर २०२४ रोजी विमा रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीमध्ये बार्शी तील एलआयसी ऑफिस मधील विकास अधिकारी उन्मेष पोतदार आणि त्यांच्या टीम जीवन स्नेह मधील अनेक सदस्य सामील होते. रॅली चा गणवेश हा महिलांसाठी पिवळ्या रंगाची साडी व पुरुषांसाठी पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट असा होता.
रॅलीचे उद्घाटन ब्रँच मॅनेजर किशोर वानखेडे व प्रशासकीय अधिकारी मंजुषा देशपांडे यांच्या हस्ते झाले. विम्याचा प्रचार व्हावा यासाठी आयोजित केलेल्या पथ नाट्य, रॅली च्या या प्रयोगाचे दोघांनी कौतुक करुन रॅलीला शुभेच्छा दिल्या.
“मेरा परिवार बीमा परिवार”, ” जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी”, “जय हिंद, जय भारत, जय एलआयसी” अशा घोषणा देऊन बार्शी नगरपालिके शेजारील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ही विमा रॅली पायी सुरु झाली.
रॅलीमध्ये वेगवेगळ्या पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये “पाचवा मुलगा – LIC, विमा संरक्षण, थँक्यू विमा काकू, सरपंच व रामा, मनी बॅक पॉलिसी कन्सेप्ट, तसेच महिला करियर एजंट आणि विमा बचत कन्सेप्ट असा वेगवेगळ्या पथनाट्यातून, विमा घेणं किती गरजेचं आहे आणि विमा संरक्षण कुटुंबाला का महत्त्वाचा आहे, तसेच पॉलिसी न घेता त्याचे होणारे दुष्परिणाम आणि पॉलिसी का घ्यावी याचे फायदे याबाबत सादरीकरण करण्यात आले. एलआयसी आपल्या कुटुंबाला कशी आर्थिक संरक्षण देते हे, या पथनाट्यातून सादर करून टीम जीवन स्नेह मधील काही सदस्यांनी खूप छान दमदार आवाजात पथनाट्य सादर केले. या वेगवेगळ्या पथ नाट्य मध्ये मारुती मोरे, राहुल चिनके, अरुणा मोरे, जयश्री पोतदार, प्रांजली ढाकणे, मीनाक्षी जाधवर, विद्या पोतदार, अनिता घोळवे, अर्चना हामने, स्वाती लुंगारे, संगीता माळी, स्वाती ढेरे, शुभांगी ढगे, संतोष मोरे, सागर गुळवे यांनी अभिनय केला. चौका-चौकामध्ये पथनाट्याचे सादरीकरण करत सोबतच एलआयसी च्या विमा घोषणांचा मोठ्या आवाजात जयजयकार चालू होता. पथ नाट्य लेखन कपिल कांबळे, मारुती मोरे, अनिता घोळवे आणि उन्मेष पोतदार यांनी केले. सयाजी महानवाऱ, पांडुरंग घोलप, विष्णू तुपे, वैजीनाथ बारबोले, अमर कदम, स्नेहा गायकवाड, शिवाजी खराडे, विठ्ठल बोकडे, विष्णू नाईकवाडी, सविता गंभीरे, कविता गोब्बुर, श्रीशैल माळी, सुनील जाधव, कीर्ती कांबळे, प्रमिला खराडे, मनीषा मस्तुद, वर्षा गजरे, सारंग कुलकर्णी, पंपाट सर या सर्वांनी रॅली मध्ये उत्साहाने सहभाग घेतला. तसेच रिक्षामध्ये बालकलाकार ज्ञानेश्वरी ढगे आणि श्रावणी पोतदार या दोघींनी विमा घोषणा माईकवर सतत चालू ठेवल्या. विमा घोषणांचा जयजयकार करत ही विमा रॅली एल आय सी ऑफिसमध्ये आल्या नंतर ऑफिस मधील सहकाऱ्यांनी रॅली तील सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. ऑफिस च्या प्रांगणात सर्वासमोर पुन्हा एकदा सर्व पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. शेवटी विमा घोषणांचा जयजयकार करत या रॅलीची सांगता झाली.
रॅली चे आयोजन व नेतृत्व विकास अधिकारी उन्मेष पोतदार यांनी केले. प्रशांत उबाळे, अनिता घोळवे यांच्या मनोगताने विमा रॅलीचा समारोप झाला. पथनाट्यासह आयोजन करण्यात आलेल्या विमा रॅलीच्या या अनोख्या प्रयोगाचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर