पुणे | कोरोना महामारीचा सगळ्यात जास्त फटका बसला तो शिक्षण क्षेत्राला. गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले शाळा कॉलेज आता हळूहळू पुर्वपदावर येत असल्याची चिन्हं आता दिसत आहेत.
महाविद्यालयं खुली करा अशी अनेक संघटनांची मागणी आहे. या मागणीचा विचार करत सरकारने कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर पुणे महापालिकेनं विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेता महाविद्यालये सुरु ठरवीत हा प्रमुख मुद्दा कोरोना संसर्ग आढावा बैठकीत मांडला होता.त्यावर लगेचच निर्णय घेत सोमवारपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी महाविद्यालयात येऊ शकतील असा निर्णय झाला आहे.
देशासह राज्यातही लसीकरण मोहिमेने जोर धरला आहे पण अजूनही असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नाही. आता कॉलेज सुरू होत आहेत.त्यामुळे लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच लस देण्यात येईल,अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर दिली आहे.
लसीकरण न झालेल्या 18 वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी आपल्या पुणे महापालिकेमार्फत थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. यासाठी महापालिका लवकरच विशेष मोहिम राबवणार असल्याची माहिती देखील मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
येत्या सोमवारपासून अर्थात 11 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली होती. विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरातच लस देण्याच्या महापालिकेचा हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. महापालिकेच्या या विशेष मोहिमेला लवकरच सुरूवात होणार आहे.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान