भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने स्विस ओपन 2022 स्पर्धा जिंकली. सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवून मोसमातील दुसरे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.

सिंधूने ४ ९ मिनिटांच्या सामन्यात थायलंडच्या प्रतिस्पर्ध्यावर २१-१६ , २१-८ अशी सहज मात केली. २०१९ च्या हाँगकाँग ओपनमध्ये या प्रतिस्पर्ध्याने तिच्यावर विजय मिळवला होता.
दरम्यान ,तिने तो हिशेब चुकता करत बुसाननवर १७ सामन्यांत १६ व्यांदा विजय मिळवला . तिच्या या विजयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी ,उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि अनेकांनी कौतुक केलं.
More Stories
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान