महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंचायत समिती बार्शी अंतर्गत दशवार्षिक नियोजन आराखडा प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन ग्रामपंचायत भानसळे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविणे. प्रत्येक कुटुंबाच्या गरजेप्रमाणे उपलब्ध संसाधनांचा विचार करून वैयक्तिक लाभाच्या कामांची जोड देत शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे. गावाचा सर्वांगीण विकास लक्षात घेता सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य शिक्षण, पर्यावरण, जल व मृद संधारण व पायाभूत सुविधांच्या विकासाशी निगडित कामांचा समावेश करणे. कुटुंबांना १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करून त्या माध्यमातून निर्माण होणारे अकुशल व कुशलचे प्रमाण लक्षात घेऊन १० वर्षांत प्रत्येक कुटुंब लखपती करण्यासाठी नियोजन करणे हे या दशवार्षिक नियोजन आराखड्याचे उद्दिष्ट आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंब ( शेतकरी, मजूर, व्यावसायिक व भूमीहीन ) लखपती करणे व गावाला समृद्ध करण्यासाठी दशवार्षिक नियोजन करणे गरजेचे आहे, असे मत आमदार राजाभाऊ राऊत यांनी व्यक्त केले.
सदरचा रोजगार हमी योजना कायदा हा संपूर्ण महाराष्ट्राला व भारत देशाला लागू करण्यामागे आपल्या बार्शी तालुक्यातील वैराग येथील आठ हुतात्मे शेतकरी, कामगार यांचे खुप मोठे योगदान असून, यामुळेच या कायद्याची व आपल्या तालुक्यातीची ओळख निर्माण झाली आहे याचीही आठवण आमदार राजाभाऊ राऊत यांनी करून दिली.
सदरच्या दशवार्षिक नियोजन आराखडा शिबीरामध्ये निमंत्रित व प्रशिक्षणार्थी यांना कुटुंब सर्व्हेक्षण नमुना व त्याचे महत्त्व समजावून सांगणे, मनरेगा अंतर्गत गाव शिवारातील कामाची पाहणी करणे व लाभार्थी यांच्या सोबत चर्चा करणे, गांव फेरी व शिवारफेरी करणे, कुटुंब निहाय सर्व्हेक्षण पूर्ण करून भूमीहीन, शेतकरी कुटुंबनिहाय नियोजन आराखडा तयार करणे, गावसभेचे नियोजन करणे इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी नायब तहसीलदार संजीवन मुंढे, सहाय्यक गटविकास अधिकारी किरण कोळपे, लघू पाटबंधारे उपअभियंता मच्छिंद्र सोनवणे, पाणी पुरवठा अभियंता श्री मंडलिक, कृषी सहायक सौ.इंगळे मॅडम, संबंधित खातेप्रमुख, सरपंच सौ. शकुंतला हिरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद