Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > माढा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत रानभाजी महोत्सवाचे उत्साहात आयोजन

माढा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत रानभाजी महोत्सवाचे उत्साहात आयोजन

मित्राला शेअर करा
संदीप कापसे यांचा रहस्य ऑईल स्टाॅल ठरला आकर्षणाचे स्थान

महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचे आयोजन कै.विठठलराव शिंदे बहुउददेशिय सभागृह,पंचायत समिती कुर्डूवाडी येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी माढा तालुक्याचे आमदार मा. श्री बबनराव (दादा) विठठलराव शिंदे यांचे शुभहस्ते व मा.श्री मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात आले.सदर कार्यक्रमात प्रांताधिकारी श्रीमती ज्योती कदम,मा.श्री राजेश चव्हाण,तहसीलदार माढा हे प्रमुख पाहुणे म्हणून तर श्री हनुमंत बोराटे तालुका कृषि अधिकारी माढा ,श्री खताळ मं.कृ.अ.,राजेंद्र नेटके मं.कृ.अ.टेंभूर्णी,श्री विठ्ठल कवठे मं.कृ.अ.मोडनिंब,श्री आनंद झिने तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा माढा व श्री शैलेश घोडके सहाय्यक तंञज्ञान व्यवस्थापक आत्मा माढा आदी मान्यवर उपस्थित होते.
जवळपास एकूण 23 प्रकारच्या रानभाज्या तालुक्यातील विविध भागातून महिला स्वंयसहाय्यता समूह यांनी विक्रीसाठी उपलब्ध केल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने कडवंची,चिघळ,घोळ,पाथरी,राजगिरा,अंबाडी, सराटा,तांदूळजा,उंबर,केना,आघाडा,आळूची पाने, शेवग्याची पाने, हादगा,टाकळी, कुरडू ,ओवा पाने,पिंपळ,कुंजीर,आदी दुर्मिळ होत चाललेल्या रान भाज्यांचा समावेश होता
सदर कार्यक्रम प्रसंगी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली मोठ्या प्रमाणावर भाज्यांची विक्री झाली. सदर महोत्सवात दहा महिला स्वंयसहाय्यता गटांनी सहभाग घेतला.रहस्य ऑइल मिल माढा चे श्री संदिप कापसे हे लाकडी घाण्यावरिल सर्व खाद्यतेलासह महोत्सवात सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री अवधूत देशमुख,बचत गट विभाग प्रमुख.पं.स.माढा,कृषि सहाय्यक श्री संदिप निकम,श्री सागर वानखेडे, श्री सचिन कदम,श्रीमती चांदणी भालेराव,यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उद्देश व प्रास्ताविक श्री संजय पाटील कृषी पर्यवेक्षक यांनी केले सूत्रसंचालन कृषि सहाय्यक श्री अनिल फडतरे यांनी केले व आभार श्री आनंद झिने , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी मानले.

संदीप कापसे यांचा स्टाॅल ठरला आकर्षणाचे स्थान

सर्वत्र उपलब्ध


या प्रदर्शनात माढा येथील युवा उद्योजक संदीप कापसे यांच्या रहस्य ऑइल,माढा यांचा ही स्टॉल लावण्यात आला होता संदीप कापसे हे पारंपरिकपद्धतीने लाकडी घाणा खाद्य तेलाची निर्मिती करतात त्यांची ही उत्पादने सोलापूर उस्मानाबाद व पूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहेत.माढा तालुक्याचे आमदार बबनरावजी शिंदे,सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री मिलिंद शंभरकर,यांनी आस्थापूर्वक स्टॉलची चौकशी केली,लाकडी घाणा तेलाची संपूर्ण माहिती घेतली आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.