बार्शी – सध्या हिवाळ्यामध्ये थंडीचे प्रमाण खूप वाढले आहे.बार्शी असो किंवा कोणतेही शहर प्रत्येक जण थंडीपासून आपला बचाव करताना दिसत आहे. पण जे लोक रत्यावर राहतात.ज्यांना कोणीही आपलं माणूस नाही.जे बेघर आहेत.आशा लोकांचं काय ? याचा विचार बार्शीतील सामाजिक जाण असणाऱ्या एका प्रतिष्ठानने केला त्यांचं नाव म्हणजे रणगंधर्व पथक.

यापथकातील सदस्यांनी स्वखर्चाने व सुलाखे डॉटर्स यांच्या साह्याने बार्शीतील डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, लातूर रोड, शनी मंदिर पूल,भगवंत मंदिर व एसटी स्टँड येथील रत्यावर राहणाऱ्या वंचित घटकांना ब्लँकेट वाटप केले
यासाठी अजिंक्य कोल्हे, ईश्वर साखरे, विजय काकडे, ऋषी डोंगळे, ओंकार डोके, प्रवीण जावीर, रोहन चौधरी, प्रणव चौधरी, आकाश देशमुख, राकेश कसबे, मयूर फराडे, लखन जाधव, स्वप्निल व्हाळे, मयूर जाधव, शुभम शेटे, गजानन काटकर, सागर लोखंडे, कपिल सरवदे, सागर वायकुळे, आशिष जंगम, अभी गायकवाड, प्रकाश जाधव, सचिन परदेशी, आदित्य ज्ञानमोठे, निखिल काकडे, संकेत राऊत, विशाल जमदाडे, सुरज पोफळे, मंगेश दहीहांडे, किशोर चव्हाण, रोहन खंबाळे, विजय चव्हाण, अक्षय बारगुळे, निखिल कानडे, समर्थ सुरवसे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रीय उद्योजकांच्या यादीत बार्शीतील कसपटे यांचा समावेश