Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > रेशन कार्ड संबंधित ही कामे कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) होणार

रेशन कार्ड संबंधित ही कामे कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) होणार

मित्राला शेअर करा

सविस्तर

शिधापत्रिका – धारकांच्या सुविधेसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर ने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी करार केला आहे

यामध्ये रेशन कार्ड संबंधित कुठलेही कामे आता कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये सोडवली जाणार आहेत

कोणती कामे CSC वर केली जातील – अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार – CSC मध्ये रेशन कार्ड अद्ययावत करणे, डुप्लिकेट रेशन कार्डची प्रिंट घेणे,रेशन कार्डला आधारशी जोडणे

तसेच रेशन कार्डची स्थिती तपासणे,नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणे आणि रेशन कार्ड संबंधित तक्रार करणे यासारखी कामे CSC मध्ये केली जातील

आता रेशन कार्ड संबंधित कामे CSC मध्ये होणार असल्यामुळे तहसील कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे कमी होणार आहेत तसेच एजंट लोकांच्या ही मागे लागण्याची गरज पडणार नाही व सामान्य लोकांची मोठी अडचण दूर होणार आहे.