7.05. 2023 रोजी सकाळी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात उंडेगाव गावचे सुपत्र उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे उपसचिव मा श्री संतोष नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी उन्हाळी संस्कार शिबिराची सांगता झाली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मधुकर डोईफोडे सर संचालक रवी पर्यावरण संस्था बार्शी हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी स्वतःचे जीवन जगत असताना अगोदर ध्येय निश्चिती करून ते प्राप्त करण्यासाठी झपाटून, पेटून उठून प्रयन्त केले पाहिजेत त्या बरोबर विद्यार्थ्यांनी अंगी शिस्त पाळावी वेळेला जीवनात महत्व द्यावे असे मोलाचे संस्कार मुलांवर केले.
विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री विजयकुमार डूरे पाटील सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व श्री महेश जगताप गुरुजी यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात गेले सात दिवस सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती मान्यवरांना दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात भविष्यामध्ये आपल्याला जर ही मुले घडवायची असतील तर अश्या संस्कार शिबिराची व्याप्ती वाढवणे गरजेचे असल्याचे नमूद केले व त्यासाठी लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली, शेवटी सर्व मान्यवरांचे हस्ते सहभागी मुलांना प्रमाणपत्र व छोटीशी भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी गावातील माजा विद्यार्थी श्री शिवाजी जगताप,मेजर संदीप गलांडे, श्री प्रकाश गुंड, श्री दिलीप पाटील सर, श्री सचिन बरबडे, श्री महादेव जगताप न्यू इंग्लिश स्कुल चे सर्व सेवक, गावातील आजी माजा विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बालाजी जगताप सर तर आभार प्रा. किरण जगताप यांनी केले
More Stories
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील