मुंबई:- माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

या वर्षीही सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था/ मंडळे, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.
वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत प्रसारमाध्यमांनी उचित दखल घेऊन त्यांना व्यापक प्रसिद्धी द्यावी.
प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात देखील वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर