Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > फॅक्ट चेक > बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीत 406 प्रकरणी तडजोड 3 कोटी 42 लाखांची वसुली

बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीत 406 प्रकरणी तडजोड 3 कोटी 42 लाखांची वसुली

बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीत 406 प्रकरणी तडजोड 3 कोटी 42 लाखांची वसुली
मित्राला शेअर करा

बार्शी – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार बार्शी तालुका विधी सेवा समिती, व बार्शी वकील संघ, यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका विधी सेवा समिती,अध्यक्ष, तथा जिल्हा न्यायाधीश मा. जयेंद्र चंद्रसेन जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण 406 प्रकरणे तडजोडीने मिटवून त्यात 3 कोटी 42 लाख 8हजार 344र रु.ची वसुली झाली.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये बार्शी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी असे 4057 व दाखलपूर्व 5230 असे 9287 प्रकरणे ठेवण्यात येऊन यात दाखल पूर्वमधील 32 प्रकरणे तडजोडीने निकाली काढून त्यात 13 लाख 61 हजार 141रु. वसुली तसेच प्रलंबित प्रकरणातील 374 खटले तडजोडीने निकाली काढून त्यात सुमारे 3 कोटी 28 लाख 47 हजार 203 रु. इतकी वसुली करण्यात आली.

या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी बार्शी न्यायालयातील एकूण पाच पॅनल तयार करण्यात आले त्यात जिल्हा न्यायाधीश- 2 मा. श्री.एल.एस.चव्हाण , न्या. रेवती एम.कंटे, न्या. एस. बी. विजयकर, न्या .जे. आर. पठाण, न्या. गायत्री एस. पाटील या पाच न्यायिक अधिकारी यांचे पँनल करण्यात येऊन त्यात न्यायालयीन कर्मचारीही नियुक्त करुन त्यांच्याद्वारे तडजोड प्रकरणे मिटविण्यात आले.

महावितरण कंपनीची जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या 7 खटल्यांमध्ये तडजोड होऊन त्यात 72 हजार रु.ची वसुली तर 138 बाउन्स झालेल्या चेकच्या 22 प्रलंबित प्रकरणातील तडजोड होऊन त्यात सुमारे 10 लाख 44 हजार रु. ची वसुली, तर बँकेच्या रिकव्हरीच्या 49 प्रकरणी तडजोड होऊन त्यात 3 कोटी 20 लाख वसुली झाली आहे. तर दाखलपूर्व 32 प्रकरणी 13 लाख 61 हजार 141 रु.व सुली झाली आहे. या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये तडजोडपात्र दिवाणी, फौजदारी स्वरुपाची प्रकरणे तसेच विविध राष्ट्रीयकृत बँका, फायनान्स, बार्शी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली होती.