सामाजिक कार्यात प्रिसिजन कॅमशाफ्ट्सच्या यतीन शहा यांचा सतत मदतीचा हात असतोच त्याचबरोबर स्वतः या कार्यात सहभागी असतात. प्रिसिजन च्या टी शर्ट नंतर प्रथमच आज दुसऱ्या संस्थेचा टी शर्ट घातला आणि मला त्याचा अभिमान वाटतोय असे यतीन शहा म्हणाले
सोलापुरातील हॉटेल , मंगल कार्यालय व कार्यक्रमातून शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न गरजूंपर्यंत पोहोच करणाऱ्या रॉबीन हुड आर्मी सोलापूर च्या वतीने दररोज अन्नदान उपक्रम राबविला जातो आतापर्यंत पाच लाख पेक्षा जास्त गरजूंना अन्नदान करण्यात आले असून विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात .
गरजु कुटुंबांना दररोज एक वेळचे जेवण मिळावे या हेतूने राबवित असलेल्या दररोज अन्नदान उपक्रमामध्ये एक सामाजिक सेवा करायची म्हणून रॉबिन हूड आर्मी सोलापूर चा टी शर्ट घालून प्रिसिजन कॅमशाफ्ट्स चे चेयरमन सन्माननीय यतीन शहा व प्रिसिजन फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा व माधव देशपांडे यांनी प्रत्यक्ष अन्न वाढून सेवा दिल्याची माहिती हिंदुराव गोरे यांनी दिली .
या वेळी बोलताना यतीन शहा यांनी प्रिसिजन च्या टी शर्ट नंतर प्रथमच दुसऱ्या संस्थेचा टी शर्ट घालून सेवा केल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले . त्याच बरोबर भविष्यात रात्री अपरात्री एक स्वयंसेवक म्हणून कायम सेवेस उपस्थित असेण असे मत व्यक्त केले . सोलापूर मध्ये अश्या प्रकारच्या कोणतीही आर्थिक देणगी अथवा बक्षीस न स्वीकारता गरजूंसाठी कार्य करणाऱ्या टीम ला समजून घेण्यासाठी व या ऊर्जेचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदाच प्रत्यक्ष सेवा करण्याचा योग आल्याचे सांगितले .
या वेळी सौ . अर्चना जाजू , निलेश जाजू , बलराज बायस , महेंद्र होमकर , आदित्य गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती . उपक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदुराव गोरे , अनिकेत चनशेट्टी , अपूर्व जाधव संदीप लिगाडे , संजीव म्हमाने , अमोल गुंड , रविकुमार चन्ना , योगेश कबाडे , ऐश्वर्या भैरप्पा , सिमरन करजगी , विघ्नेश माने , स्वामीराज बाबर , किशोर कलबुर्गी , सूरज रघोजी , संदीप कुलकर्णी , शुभम पत्तेवार , रोहित राक्षे , प्रेम भोगडे , कृष्णा थोरात , सुभाष कूरले , इब्राहिम पटेल , ओंकार कांबळे , विलास शिंदे , स्वप्नील भावर्थी , सुमित भैरामडगी , नागेश मार्गम , सुमित कोनापुरे, तमन्ना गोरे, लक्ष्मीकांत निंबाळे, श्रीराज बुरा, विश्वेत नाडीमेटला , जगदीश वासम गोपाळ नाडीगोटू , ऋत्विक राठी, अरुण कुरहाडकर, ओंकार निंबाळकर आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान