Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > रोहकल येथे पक्षी सप्ताह निमित्त पक्ष्यांच्या कृत्रिम घरट्याची कार्यशाळा संपन्न

रोहकल येथे पक्षी सप्ताह निमित्त पक्ष्यांच्या कृत्रिम घरट्याची कार्यशाळा संपन्न

रोहकल येथे पक्षी सप्ताह निमित्त पक्ष्यांच्या कृत्रिम घरट्याची कार्यशाळा संपन्न
मित्राला शेअर करा

परांडा : तालुक्यातील रोहकल येथे पक्षी सप्ताह निमित्त पक्ष्यांच्या कृत्रिम घरट्याची कार्यशाळा संपन्न झाली. 5 ते12 नोव्हेंबर राज्यात पक्षी सप्ताह साजरा केला जातो . 5 नोव्हेंबर रोजी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन तर 12 रोजी पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सालीम अली यांची जयंती . या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून महाराष्ट्र वन विभाग तसेच पक्षी प्रेमी संघटनांकडून हा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

शहरी भागात वाढत्या नागरीकरणामुळे पक्षांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. पक्ष्यांचे पर्यावराच्या दृष्टीने खूप मोठे योगदान आहे. झाडांची फळे खाऊन त्यांच्या बिया विष्ठेवाटे रुजवण्याची काम तसेच परागीभवन प्रक्रियेमुळे झाडांचे आयुष्य वाढवण्याचे काम हेच पक्षी करतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पक्षी जगले पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. शालेय विद्यार्थ्यांमध्ये अश्या उपक्रमातून निसर्गाबद्दल गोडी निर्माण होते व हेच बाल मित्र भविष्यात पर्यावरण संवर्धनाच्या कामात स्वेच्छेने पुढे येतील असे पक्षीमित्र निखिल अडसुळे म्हणाले.

ॲनिमल फ्रेंड्स, बार्शी व परांड्यातील अशितोष तिवारी आणि पांडुरंग ठोसर यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना टाकावू वस्तूपासून तयार केलीली पक्षांची घरटी भेट म्हणून दिली. अशी घरटी कशी बनवायची व यशस्वीपणे कशी लावायची याबद्दलही मार्गदर्शन केले. ऊन, वारा आणि पाऊस व अनावश्यक मनुष्याचा वावर यांपासून या घरट्याना सुरक्षा दिल्यास कृत्रिम घरट्यात पक्षी सात दिवसांत राहायला येतील असे अभ्यासातून लक्षात आले आहे.