Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > गाथा यशाची, कथा माणुसकीची! धाराशिवचे सुपुत्र न्यूरोलॉजिस्ट डाॅ. किशोर गोडगे

गाथा यशाची, कथा माणुसकीची! धाराशिवचे सुपुत्र न्यूरोलॉजिस्ट डाॅ. किशोर गोडगे

गाथा यशाची, कथा माणुसकीची! धाराशिवचे सुपुत्र न्यूरोलॉजिस्ट डाॅ. किशोर गोडगे
मित्राला शेअर करा

बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल याठिकाणी कार्यरत असणारे neurologist किशोर गोडगे यांनी ब्रेन बायपास सर्जरी ही आणखी एक जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Brain Bypass Surgery – आपण हृदयाचे Bypass Surgery ऐकली आहे पण मेंदूला झटका आल्यावर किंवा मेंदूची रक्तवाहीनी ब्लॉक (बंद) झाल्यावर पॅरालिसीस होऊ नये म्हणून ही सर्जरी असते.

यात मेंदूबाहेरी रक्तनलिका मेंदूच्या रक्तवाहीनीला जोडली जाते व मेंदूचा रक्तपुरवठा पुर्ववत किंवा पुर्वीपेक्षा चांगल्या रित्या होतो.

ही सर्जरी मुंबई सारख्या ठिकाणी सुध्दा क्वचितच होते. अशा प्रकारच्या दोन शस्त्रक्रिया JMH मध्ये डॉ किशोर गोडगे व त्यांच्या टीमने केल्या आहेत.

Epilepsy Surgeries –

फीट किंवा मिरगी यावरची ही शस्त्रक्रिया खुप दुर्मीळ किंवा अगदी क्वचितच केली जाते.

अहो आश्चर्यम्…

या शस्त्रक्रियेत (दुर्बिणव्दारे) दोन मेंदूचे भाग वेगवेगळे केले जातात व मेंदूमधील 300 दशलक्ष पेक्षा अधिक दोन मेंदूना जोडणारे बंध तोडून (Corpus Callosofomy) येणारी फीट (Seizone) थांबवली जाते.

ही शस्त्रक्रिया नुकतीच JMH मध्ये पार पाडली. यामध्ये 6 वर्षाच्या मुलाला तीस मिनिटात 30 ते 40 वेळा फीट येत होती व फीट वेगवेगळ्या औषधे घेऊनसुध्दा थांबत नव्हती.

शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही दुर्बलता न येता त्या बालकाची फीट तर थांबलीच शिवाय औषधे ही थांबली.

बहुजन हिताय, बहुजन सुखाय

वरील पेशंट असणाऱ्या मुलाच्या वडिलांनी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी खर्चासाठी स्वतःचे घर विकले, गाव सोडले. ही सगळी करुण कहाणी ऐकल्यावर डॉ किशोर गोडगे यांनी त्यांच्या ऑपरेशनची फी सुद्धा घेतली नाही.

देवदूत
मुंबई, पुणे, अहमदनगर व अमेरिकेतसुद्धा संधी असताना डॉ किशोर गोडगे हे बार्शी व ग्रामीण भागातील लोकांवर उपचार करून देवदूताची भूमिका पार पाडतायत.

Endoscopy Spire Surgeries – दुर्बिणव्दारे बिनटाक्याची मणथ्याची शस्त्रक्रिया बरेच लोक बिनटाक्याची पाठीची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे किंवा मुंबई जायचे व बराच खर्चपण करायचे.

ही शस्त्रक्रिया मागील दोन वर्षापासून अगदी रविवारी सुद्धा JMH मध्ये डॉ. गोडगे दररोज करत असुन अनेक रुग्ण लांबून/दुरुन येत असतात.

यामध्ये शस्त्रक्रियेनंतर रुग्ण चार तासानंतरच चालयाला लागतो आणि 24 तासाच्या आत घरी देखील जातो.

दुसऱ्याला दिल्यास वाढते ते फक्त ज्ञान!
डॉ किशोर यांनी केलेल्या सर्व शस्त्रक्रिया Dr. Kishor Godage Mch Neurosurgeon या युट्यूब चॅनेलवर भावी सर्जन डॉक्टरांच्या अभ्यासासाठी स्वतः डॉ. किशोर गोडगे टाकतात.