Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मित्राला शेअर करा

सोलापूर :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळमार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुंबांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.

राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी पीएम अजय योजना तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक गरजु व होतकरु लोकांनी www.lokshahir.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच.चव्हाण यांनी केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील दारिद्रय रेषेखालील व गरजू घटकांचा आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिअधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.


सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली (एनएसएफडीसी, दिल्ली) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) पीएम अजय योजना तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) थेट कर्ज योजना (रु.1 लाख) योजना सुरु करण्यात आली आहे.

सदर योजनांची माहिती महामंडळाचे “ www.lokshahir.in ” या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
तरी इच्छुक मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी,मदारी,राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजु व होतकरु लोकांनी हया कर्ज योजनांचे लाभ घेणेकरिता “ www.lokshahir.in ” या वेबसाईट प्रणालीवर अर्ज सादर करावेत, असे आवाहनही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच.चव्हाण यांनी केले आहे.