श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे माजी जनरल सेक्रेटरी प्राचार्य व. न. इंगळे यांचे आज गुरुवार दिनांक २५/०७/२०२४ रोजी सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ८८ वर्षी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली असल्यामुळे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे दुपारी २ ते ३ यावेळेत ठेवण्यात येणार आहे.
इंगळे सरांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले असून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे विद्यमान विश्वस्त आहेत.
त्यांनी देहदान केल्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून व्हि.एम. मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी नेहण्यात येईल.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न