सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून व प्रचाराची यंत्रणा प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने मतदानाचे आघाडी मिळवून दिली
सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा एकमेव उमेदवार प्रमोद (पप्पू ) देशमुख सर विजयी झाले आहेत पप्पू देशमुख सर हे भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गूळपोळी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

तब्बल दोन हजार कोटी रु व्यवसाय असणाऱ्या मुंबई येथील राज्यभरात 22 शाखा असणाऱ्या पतसंस्थेमध्ये सर्वच्या सर्व 19 जागांवर विजय प्राप्त करून समता पॅनलने सहकार पॅनल चा धुव्वा उडविला
सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा एकमेव उमेदवार पप्पू देशमुख सर यांनी यावेळी सांगितले की हा विजय माझा नसून जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व शिक्षकांचा तसेच एकजुटीचा आहे त्यांना निवडून देण्यामध्ये सर्वांनी कष्ट घेतले त्याबद्दल महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने सर्वांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले.
या निवडीबद्दल देशमुख सरांना त्यांच्या मित्र परिवार,तसेच समाजातील विविध मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
More Stories
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत