Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > सोलापूर जिल्ह्यातील कलाशिक्षकाच्या चित्रास आंतराष्ट्रीय पातळीवर प्रथम पुरस्कार

सोलापूर जिल्ह्यातील कलाशिक्षकाच्या चित्रास आंतराष्ट्रीय पातळीवर प्रथम पुरस्कार

मित्राला शेअर करा

संयुक्त अरब अमिरातच्या ( UAE) ५० व्या स्थापना दिनानिमित्त नुकत्याच पार पडलेल्या जागतिक चित्रकला स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील पोखरापूर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे कार्यरत असलेले कलाशिक्षक मोहन रमेश जाधव यांनी काढलेल्या चित्राला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिक्षण MFAमास्टर इन फाइन आर्ट (डिग्री) नागपूर विद्यापीठ. नोकरी २०१३ पासून नवोदय विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जाधव सर मध्यमवर्गीय कुटुंबातील असून वडिल माजी सैनिक आहेत शेती करतात. मोहन जाधव यांना हे चित्र काढण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागला.२५ नोव्हेंबर ला ऑनलाईन पेंटिंग ची एंट्री पाठवली. १५ डिसेंबर ला ऑनलाईन रिझल्ट जाहीर झाला.

एक हजार यूएस डॉलर (75000 ₹) व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दुबई येथील आर्ट अँड क्राफ्टस संस्थेच्या मार्फत UAE @50 (संयुक्त अरब अमिरात ५०) ही जागतिक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये १५ देशातील एकूण १०४ कलावंत या स्पर्धेत सहभागी झाले होते. चित्रकारांनी संयुक्त अरब अमिरातचा ५० वर्षाचा प्रवास व त्यांची प्रगती चित्र स्वरूप मांडली होती. जाधव यांच्या यशाबद्दल आर्ट गॅलरीचे अध्यक्ष अनिल केजरीवाल व प्राचार्य एस. सी. कोठाडी, कलाशिक्षक महासंघ अध्यक्ष दादासाहेब इंगोल, प्रदेश सचिव प्रल्हाद साळुंके, विभागीय कार्याध्यक्ष रामचंद्र इकारे , संजय पवार, सावता घाडगे आदींनी अभिनंदन केले.