बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटल हे आजपर्यंत बार्शी व आसपासच्या तालुक्यासाठी रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरले आहे.
जगदाळे मामा हॉस्पिटलचा इतिहास पाहिला तर सुरवातीला एका छोट्या खोलीत सुरू झालेल्या हॉस्पिटलमध्ये जटिल शस्त्रक्रिया करण्याचे काम डॉ .बी. वाय यादव यांनी यशस्वीपणे केले. आज या हॉस्पिटलचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाले आहे अणि हॉस्पिटलच्या या विकासाचे साक्षीदार बार्शी व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक आहेत.
आज पर्यंत आपण ऐकले मोठी शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे आणि मुंबई अश्या मोठ्या शहरात जावे लागते अणि ज्यांना अश्या प्रसंगांना सामोरे जावे लागले किंवा मोठ्या शहरात उपचार घ्यावे लागले किंवा वेळ आली आहे त्यांनाच तिथली परिस्थिती माहित आहे.
परंतु आता मेंदूच्या हृदय आणि मणक्याच्या अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रिया बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपलब्ध झाल्या असून डॉ. आदित्य साखरे ( हृदय रोग ) तज्ञ डॉ किशोर गोडगे ( न्यूरोसर्जन ) यांच्या मार्गदर्शनाखाली काही रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या विविध माध्यमातूनजवळ जवळ चाळीस कोटी रुपये निधी जमा करत जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये उभारलेल्या ट्राम केअर युनिटच पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
त्याचबरोबर आता बार्शी शहराला डॉक्टर आदित्य साखरे यांच्या रूपाने हृदयरोग तज्ञ देखील मिळाले.
डॉ. आदित्य साखरे हे बार्शीतील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण शेठ अगरचंद कुंकूलोळ प्रशालेमध्ये झालेले आहे .
त्यांना अनेक हॉस्पिटलमधून बोलवण्यात आले होते परंतु माझ्या गावांमध्ये राहून मला रुग्णांची सेवा करायची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटल हे रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.
या उपलब्ध झालेल्या वैद्यकीय सेवेचा लाभ रुग्णांनी घ्यावा असेही अवाहान संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव , वैद्यकीय अधिकारी डॉ जगताप यांनी केले आहे.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांच्या कृषि संशोधन केंद्रांना भेटी
बार्शी नगरपरीषद पथविक्रेता समिती निवडणूक बिनविरोध, आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या शुभेच्छा