संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथे स्वच्छता मोहिम राबवुन गाडगेबाबांना आदरांजली वाहण्यात आली.
शाळेतील सर्व कचरा गोळा करून त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या निमित्ताने शहरातील नागरीकांनी देखील आपआपला परिसर स्वच्छ करुन आपले शहर स्वच्छ आणि सुंदर बनवूया हा संदेश देण्यात आला.
यासाठी सर्व मुलांनी मेहेनत घेतली तसेच गणेश नारायण कदम यांचे विशेष योगदान लाभले.
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर