सरपंच परिषद मुबंई महाराष्ट्र या संघटनेच्या नूतन तालुका व जिल्हा स्तरावर पदाधिकारी निवड नुकतीच करण्यात आली. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने बार्शी तालुका व सोलापूर जिल्हा या स्तरावर नुकतेच नवीन पदाधिकारी नेमणूक करण्यात आली यात जिल्हा समन्वयक म्हणून भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा अजित बारंगुळे यांची निवड करण्यात आली
तसेच तालुका अध्यक्ष म्हणून पंडित मिरगणे यांची निवड करण्यात आली ,फारूक काझी यांची बार्शी तालुका समन्वयक ,सिद्धेश्वर आगलावे तालुका समन्वयक तर शंकर ढवण यांची पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी वरती निवड करण्यात आली.
सदर निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख आणि प्रदेश सरचिटणीस ऍड विकास जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.
अजित बारंगुळे हे मूळचे बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी या गावातील असले तरी त्यांचे शालेय शिक्षण सुलाखे हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे झाले असल्यामुळे त्यांचा शहरात देखील मित्रपरिवार मोठा आहे. फक्त राजकीय नाहीतर सामाजिक कार्यात सुद्धा मोठा सहभाग असतो.
शिवसृष्टी उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले आहे. मित्रांना सोबत घेऊन चालण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने सर्वच क्षेत्रात मोठा मित्रपरिवार आहे.
नागोबाची वाडी हे गाव शहराच्या लगत असल्याने नेहमीच महत्वाचे राहिलेले आहे मागील ग्रामपंचायत निवडणुकीत वाडीतील त्यांच्या नेतृत्वाखाली नागनाथ महाराज ग्रामविकास पॅनलने एकहाती सत्ता प्रस्थापित केली गावामध्ये अनेक नवनवीन शासकीय योजना राबवत अनेक विकासकामे केली आहेत. तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असे त्यांचे नेहमी म्हणणे असते, व्यसनापासून दूर राहिले पाहिजे हे सांगताना अगदी विनंती करून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात.
वैराग नगरपंचायतीसाठी होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत काही भावी नगरसेवकांची निराशा
त्यांच्या निवडीनंतर बार्शी तालुका व परिसरातील सामाजिक राजकीय व्यापारी क्षेत्रातील हितचिंतकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर