शासन निर्णयानुसार दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन असून सालाबादाप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता दिनांक ६ मे, २०२३ रोजी आहे. महाराष्ट्र दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
सर्व शाळांमधून दिनांक १ मे, २०२३ रोजी ‘महाराष्ट्र दिन’ सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात येणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थी, पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच, निकालासोबत विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात येणारआहेत.
वरील शासन निर्णय आणि संचालनालयाच्या पत्रामध्ये दिलेल्या सूचनांनुसार शाळांच्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२३ २४ सुरू करण्याच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक