Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > श्री. शिवाजी महाविद्यालय बार्शीच्या अर्पिता शिंदे हिची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

श्री. शिवाजी महाविद्यालय बार्शीच्या अर्पिता शिंदे हिची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

श्री. शिवाजी महाविद्यालय बार्शीच्या अर्पिता शिंदे हिची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
मित्राला शेअर करा

श्री. शिवाजी महाविद्यालय बार्शी बॅडमिंटन संघाने २२ सप्टेंबर रोजी झालेल्या १९ वर्षाखालील मुली जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. या संघात अर्पित शिंदे, योगिता खुळे, कु. घोडके या विद्यार्थ्यांनींनी सहभाग घेतला.

अर्पिता शिंदे ही श्री. शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे 12 सायन्स शाखेत शिकत असून तिची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हा क्रीडा संकुल सोलापूर येथे या जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आले होत्या.

या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामधील एकुण तब्बल ९ संघांनी सहभाग नोंदवला होता. यशस्वी खेळाडूंना संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य शेख, क्रीडा अधिकारी नदीम शेख, मार्गदर्शक प्राध्यापक संजय पाटील, पंच अर्शद शेख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.