Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > शहरात सी एन जी पंपाचे उद्घाटन पहिल्याच दिवशीच लागल्या रांगा

शहरात सी एन जी पंपाचे उद्घाटन पहिल्याच दिवशीच लागल्या रांगा

मित्राला शेअर करा

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ विचारात घेता ग्राहक इतर इंधन पर्यायांच्या शोधात आहेत यातूनच इलेक्ट्रिक वाहने ( e bike) च्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच सीएनजीचा वापरही वाढत आहे . इलेक्ट्रीक कार निर्मितीस कंपन्यांनी सुरवात केली असली तरी ग्रामीण भागात लोक इलेक्ट्रिक कार वरती विश्वास ठेवायला तयार नाहीत व ते महागडेही आहेत . मध्यंतरी lpg चा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला होता अणि आता लोक सीएनजी चारचाकी वाहनांकडे वळत आहेत.

सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांना चार चाकी मध्ये सीएनजी भरण्यासाठी शहरा बाहेर जावे लागत असायचे . पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असल्याने नागरिकांचा कौल सीएनजी कडे ओढला जात आहे . सीएनजीच्या गाड्यांचे प्रमाण सोलापुरात जास्त आहे परंतु सीएनजी पंप नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती . आता सोलापुरातील नागरिकांची प्रतीक्षा संपलेली असून १५ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी नारायण टॉकीज शेजारी एमआयडीसी रोड जवळील पाटील नगर येथील प्रो . प्रा . मल्लिकार्जुन पाटील यांचे गुरुकृपा पेट्रोलियम येथे सीएनजी पंपाचे उद्घाटन होटगीचे धर्मरत्न श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी , खा . डॉ . जयसिद्धेश्वर महाराज , महापौर श्रीकांचना यन्नम , माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख , शहर अध्यक्ष विक्रम देशमुख , सभागृहनेते शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

सीएनजी पंप सुरु होण्याची माहिती लोकांना मिळताच कार चालकांची गुरुकृपा पेट्रोलियम येथे मोठी रांग लागली.