Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी स्नेह मेळावा संपन्न

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी स्नेह मेळावा संपन्न

मित्राला शेअर करा

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे आज 1974 -76 च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.

चिंता करतो विश्वाची या ध्येयधोरणे म्हणत सोहळा सुरू झाला

माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचा उद्देश सर्वांसमोर त्यांनी मांडला. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेविषयी व कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय श्री पी. टी. पाटील साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यास मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे असे मत व्यक्त केले व त्यांनी संस्थेसाठी नेहमीच योगदान द्यावे असे आवाहन देखील केले.

माननीय श्री जयकुमार बापू शितोळे यांनी देखील माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या यशात मोलाचा वाटा आहे असे सांगितले. त्यांचे सहकार्य नेहमीच लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. बी. वाय. यादव साहेब यांनी देखील माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यास मार्गदर्शन केले व कर्मवीर मामांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी माजी विद्यार्थी स्नेह मेळावे आयोजित करणे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. दीपक गुंड सर यांनी देखील माजी विद्यार्थी मेळाव्या प्रसंगी सद्यस्थितीत असलेली शिक्षण शास्त्र विद्यालय व शिक्षक म्हणून आपली जबाबदारी या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहूणे माननीय श्री काळे साहेब यांनी देखील माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात मार्गदर्शन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या व मार्गदर्शन केले. सर्वात शेवटी आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपन्न झाला.


या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलेले कर्मवीर मामांची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन असणारे
जवळपास 50 च्या वर माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या नियोजनासाठी माननीय श्री डी. के. मोरे, श्री कानगुडे सर, श्री पाटील सर, श्री मिरगणे सर, श्री कुलकर्णी सर, श्री नेवाळे सर व अनेक माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.