Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

मित्राला शेअर करा

बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे दिनांक 7/11/2021 रोजी अध्यापक विद्यालयातील 2007-08 या बॅच मधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव साहेब, खजिनदार श्री. बापूसाहेब शितोळे, कार्यकारणी सदस्य डॉ.दिलीप मोहिते, तसेच प्राचार्य डॉ.डी.पी.गुंड सर, श्रीयुत बागल सर प्राचार्य डॉ. गोरे , सिनेअभिनेत्री विद्या सावळे, तहसीलदार धीरज मांजरे, विक्रीकर निरीक्षक श्री आबासाहेब खळतकर ,सर्व प्राध्यापक, इतर कर्मचारी व या बॅच मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते

याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ.बी. वाय.यादव साहेब,प्राचार्य गुंड सर श्रीयुत बागल सर सिनेअभिनेत्री विद्या सावळे तसेच काही माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी च्या अतिरिक्त खर्चास फाटा देऊन रुपये दहा हजार रुपयाची देणगी कर्मवीर जगदाळे मामा हॉस्पिटल मधील ट्रामा केअर युनिट साठी दिली. हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्य प्रवर्तक श्री.अमोल ताकभाते,बी.डि.ओ. निलंगा जिल्हा लातूर ,तसेच प्रमोद कानगुडे, आश्वेश ठोंगे, गुणवंत विधाते आणि संदीप गायकवाड यांनी प्रयत्न केले.विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.