Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > शरद पवार शेतकरी मेळावा आटपून जुन्या सहकार्‍यांच्या भेटीला

शरद पवार शेतकरी मेळावा आटपून जुन्या सहकार्‍यांच्या भेटीला

शरद पवार शेतकरी मेळावा आटपून जुन्या सहकार्‍यांच्या भेटीला
मित्राला शेअर करा

सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपल यांची भेट घेण्यासाठी गेले.

राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपलांच्या भेट घेण्यासाठी गेले आहेत. शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने बार्शी दौऱ्यावर असेलेल्या शरद पवार हे माजी मंत्री दिलीप सोपल निवासस्थानी पोहोचले. शरद पवारांच्या भेटीसाठी दिलीप सोपल यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शरद पवारांसोबत विजयसिंह मोहिते पाटिल, खासदार धैर्यशील मोहिते पाटिल हे देखील उपस्थित आहेत.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांनी प्रथमच दिलीप सोपल यांची बार्शीत भेट घेतली
अनेक वर्ष शरद पवार यांचे सहकारी राहिलेत. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच दिलीप सोपल यांची बार्शीत भेट घेतली आहे. 2019 च्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. आणि शिवसेनेची ताकत पाहता या भेटीची फारसा परिणाम बार्शीच्या राजकारणावर होईल अशी चिन्हे दिसत नाहीत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांना बार्शीतून या दोन्ही उमेदवारांना अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून परभवाचा सामना सहन करावा लागला होता.

बार्शीत शरद पवारांना माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांनी राखी बांधली. शेतकरी मेळव्याच्या निमित्ताने बार्शीत आलेल्या शरद पवार यांनी आपल्या जुन्या सहकारी माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांची भेट घेतली. यावेळी प्रभाताई झाडबुके यांनी शरद पवारांना राखी बांधून औक्षण करत स्वागत केले. प्रभावती झाडबुके यांनी 1962 ते 1972 या काळात विधानसभेत बार्शी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. आज भाषणात ही शरद पवार यांनी झाडबुके यांचा उल्लेख केला होता. कार्यक्रम संपल्यानंतर प्रभावती झाडबुके यांची घरी जाऊन शरद पवार यांनी भेट घेतली.