९ /९ / २०२२ रोजी शौर्यपीठ तुळापुर येथे श्री. शंभुराज्यभिषेक ट्रस्ट ची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा व इतर विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात उत्साहात कसा संपन्न होईल या वर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अँड. श्री शनिभाऊ शिंगारे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना शंभुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला. व सचिन दादा सातपुते यांचा सन्मान करण्यात आला.

श्री शंभुराज्यभिषेकट्रस्ट व श्री शंभुसाम्राज्य सेना पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. अशी माहिती शंभुराज्यभिषेक ट्रस्टच्या क्रांती ताई बोधले यांनी दिली.

More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक