Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > शेतीपंप वीजतोडणीस स्थगिती हा जागृत-लढाऊ शेतकऱ्यांचा क्रांतीकारी विजय आहे : शिवराम गायकवाड

शेतीपंप वीजतोडणीस स्थगिती हा जागृत-लढाऊ शेतकऱ्यांचा क्रांतीकारी विजय आहे : शिवराम गायकवाड

गेल्या बर्‍याच दिवसांपासून माळशिरस, पंढरपुर, करमाळा, बार्शी, सांगोला तालुक्यांसह महाराष्ट्रामध्ये थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा सुरू होता,डिपी सोडवले जात होते, अपुरा वीजपुरवठा केला जात होता अशा विविध कारणांमुळे आपली हातातोंडाशी आलेली पिके वाया जातील का काय यांसारख्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते
मित्राला शेअर करा


शेतकऱ्यांचे कैवारी तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या भोंगळ कारभार विरोधात (१)वीज तोडणी थांबली पाहिजे (२)दिवसा लाईट १० तास द्या (३)अव्वाच्या सव्वा आलेली वीजबीले दुरूस्ती करा या मागणीबाबतची भूमिका व महाराष्ट्रभर चक्काजाम रास्तारोको आंदोलन करून्, महावितरण कार्यालयात साप सोडून त्यांना साप भेट देऊन महावितरण कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांनी संघर्षाचे रान पेटविले आन् सरकारची पळता भुई थोडी केली

 सततचा खा. राजु शेट्टी यांचा महावितरण कंपनीसंदर्भातचा अभ्यासपूर्ण शेतकऱ्यांचा आक्रमक लढा याची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीनजी राऊत यांनी विधानसभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या हाती पीक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडित करणार नाही याबाबतची घोषणा केलेबद्दल महाराष्ट्रातील समस्त शेतकऱ्यांना  दिलासा मिळाला आहे व शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे 

शेतकऱ्यांप्रती या दिलासादायक घोषणा केलेमुळे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ.नितीनजी राऊत यांचे आभार मानतो व त्या निर्णयाचे समस्त शेतकरी बांधवांच्यावतीने स्वागत करतो हा जागृत एकजुट शेतकऱ्यांचा विजय आहे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

या लढ्यासाठी जनतेचे आमदार सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल,राज्यप्रवक्ते रणजीत बागल, युवाजिल्हाध्यक्ष विजय तात्या रणदिवे,जिल्हा संघटक शाहजहान भाई शेख, जिल्हाकार्याध्यक्ष सचिन आटकळे,जिल्हाउपाध्यक्ष भीमराव फुले व मदनसिंह जाधव,जेष्ठ नेते शिवाजीराव चव्हाण व मगन काळे साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुकाध्यक्ष अजितभैय्या बोरकर,दत्ताजी भोसले, माळशिरस विधानसभा अध्यक्ष साहिल आतार,माढा विधानसभा अध्यक्ष कमलाकर तात्या माने-देशमुख,युवा आघाडी तालुकाध्यक्ष अजित कोडग, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड, स्वाभिमानी पक्षाचे सिराज तांबोळी,तेजस भाकरे, प्रदिप ठवरे-पाटील, समाधान काळे, आहिल पठाण,साधु राऊत, दिपक सावंत,लक्ष्मण गायकवाड,सचिन बोरकर,स्वप्नील बोरकर,अतुलजी पिसे व असंख्य महाराष्ट्रातील शेतकरी-जनता यांच्या एकजुट लढ्यामुळे सरकारला शेतकऱ्यांसमोर नमावे लागले