गाव करील ते राव काय करील, या उक्तीचा प्रत्यय ग्रामस्थांनी दाखवून देत ग्रामस्थांच्या एकीमधून शिरापूरच्या सर्वांगीण विकासाला दिली गती
शिरापूरचे ग्रामस्थ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतात ग्रामस्थांचा सहभाग आणि एकीतून गावाचा खऱ्या अर्थाने विकास असतो . येथे विकासात्मक सुखद चित्र दिसून आले . केवळ ग्रामस्थांच्या एकीतून या गावाच्या विकासाला अधिक गती मिळाली आहे , असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले . शिरापूर सो . ( मोहोळ ) येथील गाव तलावातील जलपूजनप्रसंगी ते बोलत होते खासदार डॉ . जयसिद्धेश्वर स्वामी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यामध्ये जलसंवर्धनाचे व्यापक काम झाले
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमार्फत कोटींचा निधी खर्चून सुमारे एक लाख किलोमीटर लांबीच्या ओढ्यांचे खोलीकरण व सरळीकरण केले.त्यात आज ३४ हजार ४० टीसीएम जलसाठा , ही आनंदाची बाब आहे शिरापूर ग्रामस्थांनी लोकसहभागातून तलावातील गाळ काढला . तलावात पाणी सोडण्यासाठी पाइपलाइन विद्युतसंच बसवले . त्यामुळे भविष्यात गावाला पाणीटंचाई भासणार नाही येथे ८० टक्के कोरोना लसीकरण आहे . याचा इतर गावांनी आदर्श घ्यावा बेडसे , पत्रकार अभय दिवाणजी या वेळी तहसीलदार प्रशांत मंडल अधिकारी धैर्यशील जाधव भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सतीश काळे , संजीव खिलारे , सरपंच विजया ताकमोगे , उपसरपंच सौदागर साठे ब्रह्मदेव गोफणे , किशोर दुधगीकर अभियंता रमाकांत कांबळे , पत्रकार महेश सोवनी , कृष्णकांत चव्हाण बापूराव गावडे , सुजाता राजेपांढरे ग्रामपंचायत सदस्य वृषाली सावंत पुष्पा शेंडगे , मंगल ताकमोगे , शालिनी राजेपांढरे , सुनीता राजेपांढरे विजयकुमार चव्हाण , सागर काळे ग्रामसेविका आम्रपाली भलशंकर खासदार डॉ . जयसिद्धेश्वर स्वामी म्हणाले , शिरापुर गावातील तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत . यापुढील काळात पाणीटंचाई भासणार नाही गावाच्या विकासासाठी आपण निधी उपलब्ध करुन देऊ . सीना नदीवरून गावतलावात पाणी आणण्यासाठीच्या योजनेला मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू , स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयासाठी निधी मिळवून देऊ . पडझड झालेल्या हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीही मदत करू . अंगावर ही पवित्र वस्त्रं आहेत . त्याची प्रतिमा जपण्यासाठी शब्द देत नाही . दिलाच तर तो नक्की पाळतो , अशी ग्वाही त्यांनी दिली .
अप्पा कोळेकर , फंटू कोळेकर , अशोक काळे महाराज , प्रमोद मसलकर , प्रकाश काळे , नाना सावंत , शंकर शेंडगे ग्रा.प. सदस्य राहुल सर्वगोड व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते उपसरपंच सौदागर साठे यांनी आभार मानले , सूत्रसंचालन माजी सरपंच ब्रह्मदेव गोफणे यांनी केले
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन